अर्जदाराकरिता महत्वाची सूचना
सुभद्राबाई शिक्षण निधी संस्थेने (२०२४-२५) या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज स्वीकारणे सुरु केले आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ असेल हे लक्षात घ्यावे. नंतर कोणत्याही कारणाने अर्ज स्वीकारणे शक्य होणार नाही हे लक्षात घेणे अत्यंत जरूरीचे आहे. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी सदर प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल. त्या संदर्भात काही माहितीपत्रके येथे लावली आहेत ती प्रथम काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून अर्ज पूर्ण आणि व्यवस्थित भरता येईल.
१. अर्जदाराकरिता सूचना पत्रकामध्ये कोण अर्ज करू शकतो, त्या बद्दल माहिती आहे. तसेच संस्थेचे काही नियम देखील दिले आहेत.
२. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा याबद्दल विस्तृत माहिती मराठी आणि इंग्लिश या दोनही भाषांमधून दिली आली आहे. आपल्याला जी भाषा सोयीची वाटते त्या भाषेतील पत्रक वाचावे.
शिष्यवृत्ती अर्जाकरिता मार्गदर्शक पत्रिका_ सुभद्राबाई शिक्षण निधी संस्था
User Guide For Scholarship Application_ Subhadrabai Shikshan Nidhi Sanstha
३. जे विध्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पहिल्यांदाच अर्ज करत आहेत अथवा ज्यांनी आधी अर्ज केला आहे पण त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी २ शालेय शिक्षकांची लिखित शिफारस पत्रे आणणे आवश्यक आहे. शिफारस पत्र कसे असावे यासाठी त्याचा नमुना या पत्रकात आहे.
शालेय शिक्षकाचे नामुद्रित पत्र letter head
४. ज्या विद्यार्थ्यांना कर्जाऊ शिष्यवृत्ती घ्यायची इच्छा आहे, त्यांनी न चुकता Loan scholarship करता अर्ज भरावा. जर का कर्जाऊ शिष्यवृत्ती च्या अर्जाऐवजी केवळ शिष्यवृत्ती करिता अर्ज भरला तर कोणत्याही परिस्थितीत तो अर्ज कर्जाऊ शिष्यवृत्ती करिता ग्राह्य धरला जाणार नाही. कर्जाऊ शिष्यवृत्ती करिता अर्ज भरताना २ पत्रके अत्यावश्यक आहेत. त्याची प्रत येथे जोडत आहोत.
एका पत्रकात विद्यार्थ्याने स्वतः आपण गरजू असल्याने कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यासाठी पत्र लिहायचे आहे. दुसरे पत्र अशा एखाद्या व्यक्तीने लिहिणे अपेक्षित आहे जी तुमच्या कुटुंबाला चांगले ओळखते आणि जी तुमच्या सख्या नात्यात नाही.