शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबई कडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच आर्थिक मदतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी माहिती पत्रक.
१. ही शिष्यवृत्ती केवळ रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.
२. विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन सरकारमान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमात शिकत असला पाहिजे.
३. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरजू असणे आवश्यक आहे.
४. जात तसेच धर्म या बाबत कोणतीही अट नाही.
५. विशिष्ट गुणांची अट नाही.
६. शिष्यवृत्तीची रक्कम किमान ५००० रु. आहे.
७. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक या पत्रकाच्या शेवटी आहे. ही लिंक सर्व प्रकारच्या अर्जासाठी आहे. तेथे स्टुडन्ट स्कॉलरशिप हा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी १. गुणपत्रक, २. फी पावती/बोनाफाईड सर्टिफिकेट ३. शिधा पत्रिका (रेशन कार्ड) ४. कुटुंबातील कमावणाऱ्या सर्व व्यक्तींचा २०२२-२३ या वर्षातील उत्पन्न दाखला ५. विद्यार्थी ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतील दोन शिक्षकांची स्व हस्ताक्षरातील शिफारस पत्रे. ही शिफारस पत्रे शाळेच्या लेटर हेड वर असली पाहिजेत व शेवटी शिक्षकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक व स्वाक्षरी असली पाहिजे.
ही सर्व कागदपत्रे पीडीफ (PDF) प्रकारात लागतील.
८. शैक्षणिक खर्च जास्त असेल तर अधिक रकमेची ‘कर्जाऊ’ शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यासाठी स्टुडन्ट स्कॉलरशिप हा फॉर्म न भरता स्टुडन्ट लोन स्कॉलरशिप हा फॉर्म भरावा.
९. विद्यार्थी अपंग असल्यास विद्यार्थ्यांचे पालक सैन्यात (आजी/माजी) असल्यास, विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक (आजी/माजी) असल्यास किंवा विद्यार्थी जिल्हास्तरीय खेळाडू असल्यास त्याची प्राधान्याने निवड होते.
१०. संस्थांसाठी १. शाळा २. अंगणवाडी ३. वसतिगृह ४. वाचनालय यासाठी स्वतंत्र फॉर्म आहेत. त्याप्रमाणे अर्ज करावा.
११. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५/९/२३ ही आहे.
१२. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
१३. अर्जाची प्राथमिक छाननी झाल्यावर त्यात निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे, मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण www.subhadrabaishikshannidhi.com या वेबसाईटवर १५ ऑक्टोबर नंतर लावली जातील. विद्यार्थ्यानी १५ ऑक्टोबर नंतर दररोज वेबसाईट पाहावी.
१४. मुलाखतीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशानें (चेकने) दिली जाईल. विद्यार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. मुलाखतीस गैरहजर राहिलेल्या मुलांची शिष्यवृत्ती रद्द होईल.
१५. संस्थेच्या धोरणानुसार सख्ख्या भावंडांपैकी एकालाच शिष्यवृत्ती मिळू शकेल.
१६. शिष्यवृत्ती यादी जाहीर झाल्यानंतर, शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी कृपया संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधू नये.
१७. ON LINE अर्ज करण्यासाठी तांत्रिक माहिती खाली PDF स्वरूपात आहे. ती जरूर पाहावी.
( अर्ज कसा करावा ह्याचे मार्ग दर्शन मराठीतून )
( अर्ज कसा करावा ह्याचे मार्गदर्शन ( English ) मधून )
१८. भरलेला अर्ज आणि सोबत जोडलेले कागदपत्र यांची एक प्रत (कॉपी) स्वतःजवळ ठेवावी. मुलाखतीसाठी निवड झाल्यास मुलाखतीला येताना ते कागदपत्र व त्यांच्या मूळ प्रति (ओरिजिनल डॉक्युमेंट्स) सोबत आणाव्या.