शैक्षणिक वर्ष 2024-25 शिष्यवृत्ती

शैक्षणिक वर्ष 2024-25 शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी,

मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची व संस्थांची यादी.

१. सर्वसामान्य शिष्यवृत्ती : प्रत्येकी रु ५,००० /-
२. विशेष गुणवान विद्यार्थी शिष्यवृत्ती : प्रत्येकी रु १०,००० /-
३. कर्जाऊ शिष्यवृत्ती : प्रत्येकी रु २५,००० /-
४. संस्था : प्रत्येकी रु १५,००० अथवा ७,५०० /-

रत्नागिरी जिल्हा

मुलाखतीचा वार व तारीख — रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024.
मुलाखतीची वेळ — सकाळी ठीक 9.30.
मुलाखतीचे ठिकाण — लांजा हायस्कूल.

सिंधुदुर्ग जिल्हा

मुलाखतीचा वार व तारीख — शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024.
मुलाखतीची वेळ — सकाळी ठीक 9.30.
मुलाखतीचे ठिकाण — पणदूर तिठा येथील तिरोडकर महाविद्यालय.

मुंबई

मुलाखतीचा वार व तारीख — रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024.मुलाखतीची वेळ — सकाळी ठीक 11.00.मुलाखतीचे ठिकाण — 502, प्रसाद अपार्टमेंट, हुतात्मा चाफेकर बंधू मार्ग, मुलुंड (पूर्व), मुंबई 400 081.

सर्वांनी यादी खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या व त्याचे पूर्णपणे पालन करावे.

  1. मुलाखतीला येताना या पत्रकाची एक प्रत बरोबर आणावी.
  2. मागील वर्षी शिष्यवृत्ती मिळाल्याचे प्रशस्तिपत्रक देण्यात आले होते त्यांनी ते घेऊन
    यावे. काही कारणाने ते आपणाजवळ नसल्यास बँकेत पैसे जमा झाल्याची नोंद
    असलेले पासबुक घेऊन येणे आवश्यक आहे.
  3. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जासोबत आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांची शिफारस
    पत्रे जोडलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी शिफारस पत्राचा नमुना खाली दिला आहे.
    त्याप्रमाणे दोन शालेय शिक्षकांची शिफारस पत्रे, मुलाखतीला येताना, घेऊन येणे आवश्यक
    आहे. योग्य शिफारस पत्रे नसल्यास शिष्यवृत्ती मंजूर होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
     शालेय शिक्षकाचे नामुद्रित पत्र
  4. भरलेला अर्ज आणि सोबत जोडलेले कागदपत्र यांची एक प्रत (कॉपी) स्वतःजवळ
    ठेवावी. मुलाखतीला येताना ते कागदपत्र व त्यांच्या मूळ प्रति (ओरिजिनल डॉक्युमेंट्स)
    सोबत आणाव्या.
  5. ज्या विद्यार्थ्यांच्या मे / जुने २०२४ मधील गुणपत्रिका अर्ज भरताना मिळाल्या
    नव्हत्या त्या विद्यार्थ्यांनी आता येताना मूळ गुणपत्रिका घेऊन येणे अनिवार्य आहे

ज्या विद्यार्थ्यांनी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आहे त्यांनी दोन पत्रे सोबत घेऊन यायची आहेत.त्याचा नमुना खाली दिला आहे.
पत्रांतील रिकाम्या जागा योग्य प्रकारे भरुन पत्राखाली संबंधित व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे.

  Student Undertaking Draft

  Letter of Guarantee draft